महिलांना राष्ट्र परिवर्तनाच्या केंद्रस्थानी नेताना..
प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या गोष्टींच्या निर्मितीत महिलांचा सहभाग असतो. तनिष्का फाऊन्डेशन हे महिलांचे जागतिक परस्पर संपर्काचे (पीअर टू पीअर) नेटवर्क असून महिलांच्या आत्मसन्मानाची वैयक्तिक, घरगुती आणि सामाजिक पातळीवर खात्री देणे यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. हे नेटवर्क एकत्रित चर्चेद्वारे कार्य करते ज्यामुळे संरचित सामाजिक नेटवर्क्स निर्माण करून त्याद्वारे महिलांना एकत्र येण्यासाठी वैश्विक व्यासपीठ उपलब्ध होते. ह्या नेटवर्क्सना बहुविध हितसंबंधी समाजव्यवस्थांचे साहाय्य असते जे त्यांच्यावर परिणाम करणा-या महत्त्वाच्या प्रश्नांना ओळखून त्यांचे निराकरण करतात आणि त्यांना भावनिक, शारीरिक आणि आर्थिक सुरक्षिततेसह आत्मसन्मानपूर्ण आयुष्याची खात्री देतात. हे एका असाधारण, बहुस्तरीय संरचित प्रक्रियेद्वारे कार्यान्वित केले जाते ज्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यात समाजातील सर्व स्तरांमधून स्पष्ट असे बदल घडून येतात, जे त्यांना सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सक्षम करतात. जो आदर आणि आत्मसन्मान महिलांना मिळायला हवा, त्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यासाठी तनिष्का फाऊन्डेशन वचनबद्ध आहे आणि त्या राष्ट्रपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत याची त्यांना खात्री देत आहे.
सविस्तर वाचा